Breaking News

भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू; बसप नेता विजय यादव यांचे वक्तव्य


लखनौ : भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. भाजपवाल्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. यांना आम्ही पळवून पळवून मारू, असे विधान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्याने केले आहे. 

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त मुरादाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बसप नेते विजय यादव उपस्थितांना संबोधित करत होते. यादव यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. ’भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. भाजपवाल्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. यांना आम्ही पळवून पळवून मारू’, असं वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्यानं केलं आहे. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त मुरादाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बसप नेते विजय यादव उपस्थितांना संबोधित करत होते. यादव यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. ’नरेंद्र मोदींचं सरकार केवळ उद्योगपतींसाठी असून त्यांनी देशातील गरीबांसाठी काहीच केलं नाही. या भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू. त्यांना घाबरण्याची गरज नाही, असं यादव म्हणाले. ’भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसने देशाला इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी दिल्या. भाजपनं देशाला काय दिलं? तर नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या कुशीत बसलेले नरेंद्र मोदी, असं म्हणत यादव यांनी भाजपची खिल्ली उडवली.