Breaking News

साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र दुसर्‍या दिवशीही सुरूच


यवतमाळ/ प्रतिनिधीः यवतमाळमधील 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे. आज दुसर्‍या दिवशी कलाकारांनी काळ्या फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला आहे. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्या प्रकरणी पहिल्या दिवशी अध्यक्ष अरुणा ढेरे आणि मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती टीका केली होती.

संमेलनात आज ग.दि.माडगूळकरांच्या साहित्य संपदेचा आढावा घेणारा संगीतमय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, अपर्णा केळकर, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी सहभागी झाल्या होत्या. या चारही सहभागी कलाकारांनी काळ्या फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला. काळ्या फिती लावून गदिमांच्या कवितांचे या कलाकारांनी वाचन केले. मुंबईच्या ’मुक्त शब्द मासिक’ आणि ’शब्द प्रकाशना’ने निषेध आणि बहिष्काराचे फलक लावले आहेत.