सातारा येथील माहेश्‍वरी ट्रस्टतर्फे आनंदाश्रमात वृध्दाश्रमात दत्तक आजोबा उपक्रमसातारा, (प्रतिनिधी) : सातारा शहरामध्ये गेली 11 वर्षे सामाजिक बांधिलकीतून कार्यरत माहेश्‍वरी चॅरिटेबल फाँडेशन ट्रस्ट समाजातील वंचितासाठी अनमोल असे मदतकार्य करत आहे. या ट्रस्टतर्फे गेली पाच वर्षे सातारा शहरातील आनंदाश्रम या वृध्दांचे संगोपन करणार्‍या संस्थेतील दोन वृध्दांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण खर्च ट्रस्टतर्फे केला जात आहे. या वृध्दांसाठी आवश्यक वस्तू, धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचा भेट कार्यक्रम नुकताच आनंदाश्रमात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. सूर्यवंशी, माहेश्‍वरी ट्रस्टचे माधव सारडा आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे सूर्यवंशी यांच्या हस्ते दत्तक आजी आजोबांसाठी वस्तूंची देणगी, आनंदाश्रमाचे अध्यक्ष डॉ. शाम बडवे व दिलीप पाठक यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली. यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले, माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन करत असलेल्या कार्याचे कौतुक करताना आजच्या धावपळीच्या युगात आपला व्यवसाय, उद्योग सांभाळून समाजासाठी उपयुक्त व योग्य असे काम करणार्‍या सर्व पदाधिकार्‍यांना धन्यवाद दिले.

आज समाजात स्वार्थीवृत्ती वाढत असताना माहेश्‍वरी ट्रस्टचे कार्यकर्ते समाजातील गरजू लोकांना स्वतःच्या खर्चाने अनेक प्रकारची मदत करत आहेत हे पाहून समाधान वाटले. यावेळी त्यांनी ट्रस्टला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी माधव सारडा यांनी ट्रस्टच्या गेल्या 11 वर्षातील कार्याचा आढावा घेतला. त्यामध्ये सातारा सिव्हील हॉस्पिटल येथे दररोज दुपारी 12 वाजता रुग्ण व नातेवाईकांना जेवण, निराश्रीत लोकांना आधार देऊन पुर्नवसन करणे, थंडीमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उघडयावर झोपणार्‍या अनाथ लोकांना ब्लँकेटचे वाटप, आनंदाश्रमातील वृध्दांना दत्तक घेऊन दैनंदिन वस्तूंची देणगी अशा कार्यक्रमांची माहिती सांगितली. तसेच प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतीदिनानिमित्त सदर संस्थेला दुपारी एक वेळच्या जेवणाचे तीन हजार रुपये किंवा गोड जेवणाचे 3 हजार 500 रुपये देऊन सदर अन्नछत्र सतत कार्यरत ठेवण्यास मदत करावी. त्यामुळे सातारा शहराच्या, जिल्हयातून येणार्‍या गोर-गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची एक वेळची दुपारची भोजनाची चांगली व्यवस्था होत आहे. तसेच लांबवर राहणार्‍या नातेवाईक आपल्या प्रियजनांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून वातानाकुलित शवपेटी उपलब्ध करुन दिली आहे.
डॉ. शाम बडवे यांनी आनंदाश्रमाची माहिती सांगितली. दिलीप पाठक यांनी प्रास्ताविक व आभार मानले. माहेश्‍वरी ट्रस्टतर्फे व आनंदाश्रमातर्फे श्री. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. माहेश्‍वरी फाँडेशन ट्रस्टतर्फे आनंदाश्रमांच्या पदाधिकार्‍यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आनंदाश्रमातील सर्व आजी आजोबा, डॉ. अरविंद काळे, माहेश्‍वरी फाँडेशन ट्रस्टचे अध्यक्ष हरिनारायण कासट, सचिव दिलीप लोया, खजिनदार उज्वल सारडा, पदाधिकारी विनोद राठी, राधेशामजी भंडारी, प्रकाशजी मंडोरे, राजगोपाल चांडक, राजू कासट, मुकुंद लाहोटी, नरेंद्र मिणियार, प्रमोद लाहोटी, श्रीराम सारडा, जितेंद्र भंडारी, श्रीनिवास झंवर उपस्थित होते. तसेच सर्व माहेश्‍वरी महिलाही उपस्थित होत्या. माहेश्‍वरी ट्रस्टतर्फे सर्वांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget