Breaking News

ग्रंथाच्या वाचनामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात -प्रा.डॉ.शेटेबीड : प्रतिनिधी- ग्रंथामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. सतत वाचन, लेखन केल्यास माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी केले. माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात वाङमय मंडळ समितीच्यावतीने भित्तीपत्रके व ग्रंथप्रदर्शन उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी महाद्यिालयाच्या प्राचार्य सविता शेटे व माऊली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष नवनाथ थोटे यांच्या हस्ते फीत कापून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी वाङमय मंडळ समितीने प्रदर्शनात मांडलेल्या भित्तीपत्रकाचे वाङमयीन मूल्यमापन करुन शुध्द लेखनाच्या दृष्टीने परिक्षण करावे, तसेच भित्तीपत्रकाच्या निकषामध्ये कोणते भित्तीपत्रक बसते हे पाहून त्याची निवड करावी. आपापल्या विभागाने प्रत्येक आठवड्यातून एक आकर्षक फलक लेखन करावे. 
ग्रंथ प्रदर्शन पाहणी करतांना प्राचार्य सविता शेटे म्हणाल्या की, ग्रंथामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. सतत वाचन, लेखन केल्यास माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो. असे या प्रसंगी मार्गदर्शन केले. नवनाथ थोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, दररोज कमीत कमी दहा पाने वाचलीच पाहिजेत, ग्रंथालयाचा नियमीत उपयोग करुन घेतल्याने बौध्दीक वाढ होवून सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.