Breaking News

’भारत की बात’ शो मध्ये दिसणार सह्याद्री देवराई प्रकल्पाची माहिती


दहिवडी (योगेश गायकवाड) : सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री देवराई’ प्रकल्प महाराष्ट्र आणि माण तालुक्यातील विविध ठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी एका वृत्तवाहिनीने भेट दिली. यामध्ये दिवडी, पिंगळी, धामणी या ठिकाणी स्थानिक गावकर्‍यांना भेट देऊन येणार्‍या आडचणी आणि झाड जगवण्यासाठी केलेले उपाययोजना आणि झाडाचे महत्त्व जाणून घेण्यात आले. 

यावेळी देवराईचे सम्नवयक योगेश गायकवाड, संतोष काटकर, माजी सरपंच मारुती पाटील, सतेज कुमार माळवे, रवींद्र जाधव, चंद्रकांत नाकडे, ज्योतिबा पुजारी, दादा जाधव, पांडुरंग जाधव, सुधाकर नाकडे, निलेश खाडे, सुशांत नाकडे, चैतन्य खाडे उपस्थित होते.

निर्माती पल्लवी जोशी, अथर्व प्रोडक्शन एपिसोड डायरेक्टर देवेंद्र सिंह, सिरीज डायरेक्टर विवेक अग्निहोत्री, निवेदक पल्लवी जोशी यांच्या भारत की बात या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे. माण तालुक्यातील या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची माहिती निसर्ग प्रेमींना टिव्हीवर नक्की पहायला मिळणार आहे.