उमेदवारीचे दावे करणार्‍याचे प्रगती पुस्तक पहा -डॉ.विखे; जवळा येथे आरोग्य शिबीर


जामखेड ता/प्रतिनीधी
जामखेड तालुक्यात सुजय विखे यांचा नान्नज, वाघा, जवळका, हळगाव, ह्या गावात दौरा होता. या वेळी उमेदवारीचे दावे करणार्‍याचे प्रगती पुस्तक, पुर्वइतिहास पहावा. लोकसभेचे बिगुल वाजले आहे. अशा वेळेस अनेकांना उमेदवारीचे स्वप्न पडू लागतात. व मतदारांना वेगवेगळ्या भूल थापा आश्‍वासन प्रलोभन किवा पक्षाच्या, चिन्हाच्या आणा भाका दिल्या जातात. परंतु मतदरांनी सुज्ञपणे ह्या सगळ्या संभाव्य उमेदवारांचे प्रगती पुस्तक, त्यांचा पुर्व इतिहास, त्यांनी केलेली कामे, त्यांना असलेली लोकांच्या प्रश्‍नाची समज याचा सारासार विचार करावा. व निर्णय घ्यावा असे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले. वाघा तालुका जामखेड, येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

जनसेवा फाउंडेशन व डॉ. विखे पाटील मेमोरीयल हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यामाने जवळा येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. जामखेड तालुक्याच्या दौर्‍यात डॉ. सुजय विखे यांचा विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाघा, बोर्ले, नान्नज, जवळके, जवळा हळगावच्या ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
मला पक्षाची गरज नाही, चिन्हाची गरज नाही, असा अप्रचार केला जातो. मात्र, प्राप्त परीस्थीत जर उमेदवारी मिळत नसेल तर लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्‍नांना वाचा फोडायची नाही, केवळ बघ्याची भुमिका घ्यायची. हे आपल्याला मान्य नाही. व त्यासाठी संघर्ष करावा लागेन असे आपण म्हटले आहे. कॉग्रेस ही चळवळ आहे. विचार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. भाजपा प्रवेश बाबत विरोधक जाणीवपुर्वक राळ उठवत आहे. उलट त्यापेक्षा माझ्यावर टिका करण्यांनी त्यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा त्यांनी केलेली विधायक कामे जनतेपुढे मांडवीत व त्याजोरावर कौल मागावा. आरोग्य शिबीरांच्या माध्यामातून आम्ही गरजू गोर गरीब रुग्णांची सेवा केली त्यांचे आर्शिवाद घेतले. याच आरोग्य शिबीराचा धसका विरोधकांनी घेतला असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला कर्जत, जामखेड मतदारसंघाची व एकदरीत दक्षिणेतच्या दुष्काळाचा प्रश्‍न त्यांनी उपस्थीत केला. मतदराने आता जागृत होऊन लोकप्रतिनिधींना त्यांच्या भूमिके बाबत प्रश्‍ना विचारले पहिजे. याप्रसंगी मा.जि.प.सदस्य मधुकर राळेभात, ता.अध्यक्ष सुधीर राळेभात, अंकुशराव ढवळे, अमोल राळेभात, अरुण वराट, अमजद पठाण, डिंगाबर चव्हाण, आदम शेख उपस्थीत होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget