Breaking News

स्वीकृत’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

नगर । प्रतिनिधी -
महापालिकेत स्वीकृत सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, नेतेमंडळींना अनेकांनी गळ घातली आहे.
पक्षीय संख्याबळानुसार एकूण 5 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजप 1 असे स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. महापौरांकडून महासभेचा अजेंडा काढल्यानंतर पहिल्याच महासभेत या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
महापालिकेचे एकूण 68 सदस्य आहेत. या सभागृहासाठी पाच स्वीकृत नगरसेवक संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या 24 नगरसेवक असल्याने संख्याबळानुसार त्यांच्या वाट्याला 2 स्वीकृत नगरसेवकपदे येतात. राष्ट्रवादीने एका अपक्षासह 19 नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याही कोट्यातून 2 स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत. भाजपची 14, काँग्रेस 5 व बसपा 4 सदस्यांची गटनोंदणी झाली आहे. भाजपला एक स्वीकृत नगरसेवकपद मिळणार असून, काँग्रेस व बसपाचा विचार होणार नाही.