Breaking News

कृषी अभ्यास दौर्‍याचा लाभ जावलीतील शेतकर्‍यांनी घ्यावा


केळघर (प्रतिनिधी) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच दिवसांच्या शेतकरी अभ्यास दौर्‍याचे आयोजन वाईच्या उपविभागीय कृषी अधिकार्‍यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या कृषी अभ्यास दौर्‍याचा लाभ जावली तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन जावलीचे कृषी अधिकारी अविनाश मोरे यांनी केले आहे. 

पाच दिवसाच्या कालावधीत प्रगतशील शेतकर्‍यांच्या शेतावर शेडनेट, हरितगृहातील भाजीपाला लागवड, सामुहिक शेततळे, शेततळ्यातील कागद अस्तरीकरण, कांदा चाळ, कांदा ग्रेडींग व पॅकिंग, स्ट्रॉबेरी लागवड टोमॅटो प्रक्रिया केंद्र, भाजीपाला रोपवाटीका यांच्यासह सामुहिक गटशेतीचा समावेश करण्यात आला आहे.