Breaking News

सुनील पोरवाल कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी


मुंबई : राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त म्हणून गृह विभागाचे निवृत्त अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी शपथ घेतली. पोरवाल यांना मुख्य माहिती आयुक्त सुमीत मल्लिक यांनी पदग्रहणतेची शपथ दिली.

याप्रसंगी मुख्य सचिव डी. के. जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्याम गोयल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त अजित कुमार जैन, वन विभागाचे सचिव विकास खारगे, जलसंधारण व रोजगार हमी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माजी अपर मुख्य सचिव भगवान सहाय, एस. एस. संधू यावेळी उपस्थित होते.