देशाच्या विकासाचा मार्ग शिक्षकांच्या प्रयत्नातून - रत्नपारखी.


पाथर्डी/प्रतिनिधी 
शिक्षकांच्या प्रयत्नांवरच समाज घडला जातो आणि आजचे विद्यार्थी उद्याचे सुज्ञान नागरिक आहेत. या विद्यार्थ्यांवर ज्ञान आणि संस्काराची रुजवण करणार्‍या शिक्षकांचा देशाच्या जडण घडणीमध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे देशाच्या विकासाचा मार्ग शिक्षकांच्या प्रयत्नातून जातो असे प्रतिपादन पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित बारावी निरोपसमारंभ कार्यक्रमात केले. 


विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी यशस्वी होण्यासाठी महापुरुषांचा आदर्श घ्यावा. चिकटी व प्रयत्नांच्या जोरावर यश हमखास मिळवता येते. अपयशाने खचून न जाता पुन्हा ताकतीने उभा राहा. कायद्याचे रक्षण करा, रहदारीचे नियम पाळा, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून अलिप्त राहा, इंटरनेटचा गैरवापर टाळावा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा आणि आयुष्यात हमखास यश मिळवण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश रत्नपारखी पर्यवेक्षक प्रा.शेखर ससाणे, प्रा.रमेश मोरगावकर, ईश्‍वर गर्जे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रा. डॉ.जी.पी.ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना हा निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ आहे. तुमचे व तुमच्या पालकांचे स्वप्न साकारण्यासाठी पुढील वाटचालीस व येणारे बारावी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कु निकिता भापकर, कु सोनाली चव्हाण, कु आकांक्षा फुटाणे, प्रवीण गायकवाड, विवेक बडे, अभिषेक कोकाटे, अशोक डोंगरे या विद्यार्थ्यांनी तर प्रा. रमेश मोरगावकर, प्रा. देवेंद्र कराड, प्रा. सलीम शेख या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेखर ससाणे सूत्रसंचालन प्रा. मन्सूर शेख तर आभार प्रा.अजित पालवे यांनी मानले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget