Breaking News

सरकारच्या निषेर्धात कोतवाल संघटनेचे रक्तदान


सातारा,  (प्रतिनीधी) : गेली 21 दिवसापासून सुरु असलेल्या सातारा कोतवाल संघटनेचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोनल सुरु आहे. चतुर्थ श्रेणीत समावेश करण्यासाठी काम बंद व धरणे आंदोलन या संघटनेच्यावतीने सुरु आहे, मात्र अजूनही याच्यावरती आतांपर्यंत काहीही तोडगा निघाला नाही.
त्यामुळे कोतवाल संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये संघटनेेचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्व पुुरुष, महिला यांनी रक्तदान करत सरकाचा निषेध केला. या रक्तदान शिबीरीत एकूण 58 जणांनी रक्तदान केले. गेली 21 दिवस झाले संघटनेची असलेली मागणी पूर्ण झाली नाही. केवळ आश्‍वसनच दिले जात आहे.
प्रशासन फक्त संघटनेच्या कार्यत्यांचे रक्त गोठवत आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही रक्तदान करत प्रशासनाचा निषेध करत सामाजिक बांधिलीकी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे संघटनेच्या वतीन सांगण्यात आले. जो पर्यंत आम्हाचा चतुर्थ श्रेणीत समावेश करत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.