Breaking News

आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभपाथर्डी/प्रतिनिधी
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात बारावी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मंगळवारी घेण्यात बाबूजी आव्हाड महाविद्यालयात घेण्यात आला.
यावेळी बोलताना पो.नि. रमेश रत्नपारखी यांनी असे प्रतिपादन केले की, शिक्षक हे समाज घडवण्याचे काम करत असतात, तर विद्यार्थी उद्याचे सुज्ञान नागरिक असून उद्याचे ते भविष्य या विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवन करणार्‍या शिक्षकांचा देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी महापुरुषांचा आदर्श घ्यावा चिकाटी व प्रयत्नाच्या जोरावर जीवनात हमखास यश मिळवता येते. अपयशाने खचून न जाता पुन्हा ताकतीने उभे रहा कायद्याचे रक्षण करा. रहदारीचे नियम पाळा, गुन्हेगारी प्रवृत्ती पासून अलिप्त रहा, इंटरनेटचा गैरवापर टाळा, आयुष्यात चांगल्या गोष्टी आत्मसात करा. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. ढाकणे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश रत्नपारखी होते.

 तसेच प्रा. शेखर ससाने. रमेश मोरगावकर, ईश्‍वर गर्जे आदी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. ढाकणे म्हटले की, हा निरोप समारंभ नसून तुमच्या आयुष्याची सुरवात आहे. तुमचे व तुमच्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्याचा हा दिवस आहे. येणार्‍या बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निकिता भापकर, सोनाली चव्हाण, आकांक्षा फुटाणे, प्रवीण गायकवाड, विवेक बडे, अभिषेक कोकाटे, अशोक डोंगरे, या विद्यार्थ्यांनी तर प्रा.रमेश मोरगावकर, देवेंद्र कराड, सलीम शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शेखर ससाणे सूत्रसंचालन प्रा.मन्सूर शेख, प्रा.अजित पालवे यांनी आभार मानले.