विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडीचा वाद
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा 114 व्या पदवी प्रदान कार्यक्रमात पुणेरी पगडी चा निषेध करत काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोंधळामुळे पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला प्रथमच गालबोट लागल्याची घटना घडली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 114 व्या पदवीप्रदान समारंभाला गालबोट लागले.. या सोहळ्यात कुलगुरू आणि विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी ’पुणेरी पगडी’ घातल्यामुळे पदवी प्रदान कार्यक्रमाला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली आणि पुणेरी पगडीचा निषेध केला. दरम्यान घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी तातडीने या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमस्थळापासून दूर केले. त्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला. यंदापासून विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभ ब्रिटिशकालीन गणवेशाऐवजी भारतीय पारंपारिक पोशाखात साजरा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार समारंभात आज ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा, पांढर्‍या रंगाचा पायजमा आणि उपरणे असा गणवेश ठेवण्यात आला आहे. मात्र, या गणवेशाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला होता. विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यकर्यामात पगडीचा वाद निर्माण झाला असताना विद्यापीठाने पुणेरी पगडी रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वाना एक प्रकारचा पोशाख असतानादेखील कुलगुरु, प्राध्यापक आणि इतर मान्यवरांनी पुणेरी पगडी घातली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पदवी प्रदान समारंभात वापरण्यात आलेला पोशाख हा पेशवाईच्या काळातील असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पुणेरी पगडीला काही विद्यार्थ्यांचा विरोध होता. पुणेरी पगडीऐवजी फुले पागोटे वापरण्यात यावे, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget