Breaking News

प्रितेश गादिया यांना किसान गौरव पुरस्कार


शिरूर/प्रतिनिधी
शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश प्रदीप गादिया यांना किसान मजदूर वाहिनी व युवा किसान वाहिनीतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, विश्‍व हॉटेल समोर टिळक रोड, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते किसान गौरव पुरस्काराने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश प्रदीप गादिया हे सतत शिरूर युवा विकास मंचाच्या माध्यमातून शहरात व तालुक्यात विविध उपक्रम राबवून जनसामान्यांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे बहूमोल असे कार्य करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शेतकरी सन्मान व मार्गदर्शन समारंभ तसेच कृषी रत्न कृषी मित्र तथा समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रितेश प्रदीप गादिया यांना डॉ. मनमोहनसिंग रावत मा.कॅबिनेट मंत्री कृषी विभाग उत्तराखंड सरकार, डॉ.शंकर राऊत जेष्ठ कृषीतज्ञ, डॉ.टी.बी. कोळेकर कृषीतज्ञ , साधना तुरखिया राष्ट्रीय महासचिव किसान मजदूर वाहिनी, सचिन भालिंगे कृषी पत्रकार संघ, निलेश अग्रवाल अध्यक्ष किसान मजदूर वाहिनी महाराष्ट्र, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक निलेश होले अध्यक्ष युवा किसान वाहिनी महाराष्ट्र यांच्या हस्ते किसान गौरव पुरस्काराने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश प्रदीप गादिया यांना किसान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल शहरातील नागरिक व विविध क्षेत्रातील संघटनांच्या वतीने अभिनंदन व होत आहे.