Breaking News

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांच्‍या विकासकामांसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी


   
(  समीर शेख  )
जामखेड ता.प्रतिनीधी  -जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्‍यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जामखेड व कर्जत तालुक्यातील गावातील मुलभूत सुविधा व विकासकामांसाठी  पाच कोटी  रूपयांच्‍या निधीला प्रशासकीय  मंजूरी  दिली आहे.
            गावांतर्गत मुलभुत सुविधांच्‍या कामांसाठी निधी उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत अनेक लोक प्रतिनिधीकडून प्रस्‍ताव शासनाकडे प्राप्‍त होत असतात. या प्रस्‍तावाच्‍या अनुषंगाने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सु‍चविलेल्‍या कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांच्‍या मुलभूत विकासासाठी आवश्‍यक निधीला प्रशासकीय  मंजूरी देण्‍यात आली आहे. सन 2018-19  या आर्थिक वर्षात अहमदनगर जिल्‍हयातील कर्जत व जामखेड तालुक्‍यातील 77 विविध विकास कामांसाठी 5 कोटी रक्‍कमेच्‍या कामास प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. वित्‍त विभागाने मंजूर निधीच्‍या 70 टक्‍के मर्यादेत निधी वितरण करण्‍याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत.  त्‍यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर यांना उपरोक्‍त मंजूर निधीच्‍या 70 टक्‍के प्रमाणे 3 कोटी 50 लाख इतका निधी  वितरीत करण्‍यात येत आहे.
        जामखेड तालुक्‍यातील- चोंडी येथीलजि.प.प्रा.शाळा कंपाऊंड बांधणे (10), रत्नापूर येथील स्मशानभूमी अंतर्गत पेविंग ब्लॉकबसविणे(04), महारुळी येथे ग्रामपंचायतकार्यालय बांधणे(10), जातेगांव ते काळेवस्तीरस्ता काँक्रीटीकरण करणे(05), तरडगांव येथे घाट बांधणी करणे (10), दौंडाचीवाडी येथे मारुतीमंदीर रस्ता काँक्रीटीकरण करणे (07), पिंपळगांवआ, येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे(10),आपटी  येथे स्मशानभूमी बांधकाम करणे(07),पिंपळगांव उ, येथे चान्नाप्पा मंदीर कंपाऊंडबांधणे(05), तेलंगशी  येथे जि.प.प्रा.शाळाकंपाऊंड बांधणे(10), मौजे खर्डा, ता. जामखेडयेथे बस स्थानक ते खडकपुरा चौक रस्ताकाँक्रीटीकरण करणे (30), मोहा (हापटेवाडी) येथेसभामंडप बांधणे (05), मोहा (रेडेवाडी) येथेसभामंडप बांधणे(05), रत्नापूर (सांगवी) येथे गावअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे (07), सतेवाडीयेथील मारुती मंदीर सभामंडप बांधकाम करणे(04), चोभेवाडी येथील गाव अंतर्गत सभागृहबांधणे(10), जवळके येथील ग्रामपंचायतसमोरील जागेत पेविंग ब्लॉक बसविणे (05),नायगाव येथील आनंदवाडी नायगाव रस्ता तेमारुती मंदीर रस्ता काँक्रीटीकरण करणे (10),नागोबाची वाडी येथे भगवान बाबा मंदीरासमोरपेविंग ब्लॉक बसविणे (05) अशा विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्‍यात आला आहे.
कर्जत तालुक्‍यातील – चिलवडी येथेहनुमान मंदीरासमोर सभामंडप बांधणे (05),थेरवडी येथे श्रीकृष्ण मंदीर कळम वृक्षासमोरपेव्हिंग ब्लॉक बसविणे (03), बेनवडी येथे बेनवडीगावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (10), माहीयेथे व्यायाम शाळा उभारणे व साहित्य पुरविणे(10), तरडगांव येथे तरडगांव ग्रामपंचायतकार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे (10),तोरकडवाडी  येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणकरणे (10), तिखी येथे हौसराव शिंदे वस्ती तेबेलगांव-मिरजगांव रोड मुरमीकरण करणे (10),भोसा येथे व्यायामशाळा साहित्य देणे (1.50),शिंपोरा येथे स्मशानभूमी बांधकाम करणे(10),रुईगव्हाण अंतर्गत नाथाचीवाडी येथे राधेकृष्णमंदीरासमोर सभामंडप बांधणे (10), नागलवाडीयेथे हायमास्ट दिवे बसविणे (02), निमगांवडाकूगावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (10),गणेशवाडी येथे नदीघाट बांधणे (10),ज्योतीबावाडी येथे ज्योतीबासमोर पेव्हिंग ब्लॉकबसविणे (03), कापरेवाडी शिंदेवाडी गावांतर्गतरस्ता काँक्रीटीकरण करणे(10), चांदे खु.गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (10),नांदगांव येथे स्मशानभूमी बांधकाम करणे (10),शिंपोरा येथे मानेवाडी विठ्ठल मंदीरासमोरसभामंडप बांधणे (05), वालवड येथेजि.प.शाळेस वॉल कंपाऊंड करणे (04),धांडेवाडी येथे जिम्नॅशियम हॉल बांधणे व साहित्यदेणे (10), कुंभफळ येथे सभागृह बांधणे (20),निंबोडी वस्ती शाळेकडे जाणारा रस्ता खडीकरणकरणे (03), शितपुर येथे रस्ता काँक्रीटीकरणकरणे (03), मलठण येथे आनंदवाडी-पवारवाडीरस्ता मुरमीकरण करणे (03), म्हाळंगी येथेम्हाळंगी ते जगताप वस्तीदरम्यान मोरी बांधकामकरणे (03), निंबे येथे निंबे ते डोंबाळवाडीदरम्यान बांधकाम करणे (03), खातगांव येथेखातगांव ते फुंदेवस्ती दरम्यान मोरी बांधकामकरणे(03), पाटेवाडी येथे पाटेवाडी रस्ता ते कदमवस्ती दरम्यान मोरी बांधकाम करणे (03),पाटेवाडी, येथे पाटेवाडी ते जळकेवाडी फाटादरम्यान मोरी बांधकाम करणे (03), बहिरोबावाडी-तांदळेवस्ती येथील जि.प.शाळेस वॉल कंपाऊंडबांधणे(03), बहिरोबावाडी गावठाण येथीलशाळेस संरक्षक भिंत बांधणे (03), नवसरवाडीजगताप वस्ती येथील शाळेस वॉल कंपाऊंडबांधणे (03), झिंजेवाडी येथे जि.प.शाळेस वॉलकंपाऊंड बांधणे (03), पाटेवाडी   कदमवस्तीयेथील जि.प.शाळेस वॉल कंपाऊंड करणे(03),पाटेवाडी खंडोबावस्ती येथील जि.प.शाळेस वॉलकंपाऊंड करणे (03), चापडगांव शिंदेवस्ती तेजि.प.शाळा रस्ता मुरमीकरण करणे (03),निमगांव गांगर्डा येथे भैरवनाथ समोर पेव्हिंगब्लॉक बसविणे. (05), थेरगांव गावांतर्गत रस्ताकाँक्रीटीकरण करणे(6.50), बेलगांव गावांतर्गतरस्ता काँक्रीटीकरण करणे (07), घुमरी सभामंडपबांधणे (05), घुमरी  हनुमान वस्ती ते गवळीवस्तीरस्ता मुरमीकरण करणे (03), तिखीबोबडेवस्ती ते चोपान (मळई) पर्यंत मुरमीकरणकरणे (03), तिखी हरिजनवाडा तालीमपासून तेखरपुडे वस्ती रस्ता मुरमीकरण करणे (03),काळेवाडी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (10),चखालेवाडी गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणकरणे(06), खुरंगेवाडी सभामंडप बांधकाम करणे(05),  चांदे खु. मारुती मंदीरसमोर सुशोभीकरणकरणे (04), जलालपुर  म्हसोबा देवस्थान येथेसभामंडप बांधणे (08), बारडगांव दगडीग्रामपंचायत कार्यालयासमोर सुशोभिकरणकरणे(07), चांदे बु. सावतामाळी मंदीरासमोरसभामंडप बांधकाम करणे(05), राक्षसवाडी खु.गावठाण हद्दीत सभामंडप बांधकाम करणे (05),कापरेवाडी खु.डिसलेवस्ती-गायकवाड वस्तीरस्ताखडीकरण करणे(03), करपडी भैराबासायकरवस्ती येथे सावतामाळी मंदीरसमोरसभामंडप बांधकाम करणे (05), मुळेवाडी  दत्तयोगीराज संस्था मुळेवाडी येथे सभामंडपबांधकाम करणे (05) बर्गेवाडी ते गुऱ्हाळ वस्तीरस्ता मुरमीकरण करणे (05), बेनवडी येथेसभामंडप बांधकाम करणे (05) व  थेरवडी गांवते चिलवान वस्तीरस्ता खडीकरण करणे (07) अशा विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्‍यात आला आहे.कर्जत व जामखेड चे नागरिकांनी पालकमंत्री राम शिंदे यांनी कामाची मंजूरी आणल्या बद्दल  अभिनंदन केले