Breaking News

शेतकरी संघर्ष समितीने बिलासाठी प्रादेशिक कार्यालयास ठोकले टाळे


माजलगाव : प्रतिनिधी

दोन महिन्याच्यावर कालावधी लोटला तरी गाळप झालेल्या उसाचे पैसे कारखानदारांनी शेतकर्‍याना देऊ केले नसल्यामुळे तीव्र दुष्काळाच्या झळा सोसत असणार्‍या बळीराजासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या कार्यालयास दि.८ मंगळवार रोजी टाळे ठोकले. गत दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून उसाचे गाळप विविध कारखाण्याकडून करण्यात येत आहे अनेक कारखान्याची उसाच्या गाळपाची उद्दिष्टपूर्ती देखील जवळपास आहे.गाळप झालेल्या उसाचे पैसे गळीत झालेल्या दिवसापासून १५ दिवसात देणे आवश्यक असताना अद्याप परेंत ना उसाचा भाव घोषित झाला ना उसाचे पैसे शेतकर्‍यांना मिळाले.माजलगाव तालुक्यात ३ साखर कारखाण्यामार्फत उसाचे गाळप सुरु आहे.

त्यात दोन सहकारी तर एक खाजगी तत्वावर सुरु आहे.उसाचे पैसे देण्यात यावे यासाठी दि.२ रोजी भाई गंगांभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक प्रादेशिक कार्यालय यांना तसे निवेदन हि देण्यात आले होते परंतु निवेदन देऊन देखील कोणतीच ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.कारखानदाराशी संगनमत करून देवाण घेवाण करून शेतकर्‍याच्या जीवावर चालणारेहे कार्यालय दि.८ मंगळवार रोजी टाळे ठोकण्यात आले.