Breaking News

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी अविनाश मगरे


शेवगाव/प्रतिनिधी


शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्याची कार्यकारणीची नावे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आज पक्षाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. शेवगाव येथील माजी पंचायत समिती सभापती तसेच अ‍ॅड. अविनाश मगरे यांची शेवगाव तालुका पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे शेवगाव तालुका तसेच पाथर्डी तालुक्यातून व परिसरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या निवडीने शिवसेना पक्षाला शेवगाव तसेच पाथर्डीमध्ये बळ मिळणार आहे. आपल्या या आपण सार्थकी लावू तसेच आपण शिवसेना पक्ष वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु असे, यावेळी अविनाश मगरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.