Breaking News

सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे : रावसाहेब दानवे


कराड (प्रतिनिधी) : भाजप-शिवसेना युती व्हावी, यासाठी आम्ही शेटवच्या मिनिटापर्यंत प्रयत्न करणार आहोत. आम्ही सर्वच मतदारसंघांचा आढावा घेत आहोत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा जरी शिवसेनेचा असला तरी जर आमची ताकद याठिकणी वाढली तर तो भाजपाकडे राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

गोटे (ता. कराड) येथील महिंद्रा हाँटलमध्ये भाजप पदाधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पक्षाच्या प्रभारी नीता केळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. दानवे म्हणाले, यातील 48 पैकी 41 व्या मतदारसंघाच्या दौर्‍यावर आज मीआहे. येत्या 25 तारखेपर्यंत राज्याचा दौरा पूर्ण होईल. सध्या आढावा घेण्याचे काम चालू आहे. शिवसेनेच्या एकाद्या मतदारसंघात आमचे जेथे काम वाढेल, तेथे आम्ही तयारी केली तर ते एनडीए घटक पक्षाच्या फायद्याचेच आहे. शेवटी सर्वांचा प्रयत्न हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हाच आहे. सातारा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी आमची कोणतीच, कधीच चर्चा झाली नसल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.


मलकापूर भाजपच जिंकणार

सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्टया अत्यंत महत्वाची मलकापूर नगपालिकेची निवडणूक लागली आहे. तेथे काय होईल हे पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विचारले असता, तेथे भाजपाच्या विरोधात सर्व पक्षांनी एकी केली असली तरी विजय हा भाजपाचाच होईल असे सांगितले.