Breaking News

आई-वडीलांचे वाढदिवस साजरे करून ऋण व्यक्त करण्याची गरज - धनश्री विखे


राहुरी/प्रतिनिधी 
मुलांचे वाढदिवस कायमच साजरे होतात. परंतु ज्यांनी आपल्या जन्म दिला. आपल पालन पोषन करुन लहानचं मोठ केलं, त्या आई वडीलांचे वाढदिवस साजरे करुन त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्याची आज समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन धनश्री विखे यांनी केले. 

येथील शेतकरी नेते राजेद्र लोंढे व लोंढे परिवाराने त्यांचे वडील ह.भ.प. काशिनाथ लोढे, मातोश्री शांताबाई लोंढे यांच्या व गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश शास्री ढेपे यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी लोंढे परिवाराचा प्रवरा उद्योग समुहाच्यावतीने सन्मान करतांना धनश्री विखे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर देवगड देवस्थानचे ह.भ.प. भास्करगिरी महाराज, आ. भाऊसाहेब कांबळे, निमसे, गणेश भांड, शिवाजीराव कपाळे, करण ससाणे, सचिन गुजर, एस. झेड. देशमुख, आसाराम ढुस, सिताराम ढुस, डॉ. प्रसाद ढुस, डॉ. आप्पासाहेब ढुस, तान्हाजीराव धसाळ, शांताबाई व काशिनाथ लोंढे, प्रकाश शास्री ढेपे, गोरख चव्हाण आदी उपस्थित होते.