मारहाणीप्रकरणी कर्जत पोलिसांचा फिर्याद घेण्यास नकार


कर्जत/प्रतिनिधी 
मारहाणीचा गुन्हा दाखल करावयास आलेल्या फिर्यादीचे म्हणणे एकूण न घेता त्याची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणार्‍या कर्जतच्या पोलिस निरीक्षकांनां पोलीस अधीक्षकांच्या दणक्यानंतर पंधरा दिवसानंतर फिर्याद घेणे भाग पडले असून यामुळे कर्जत येथील पोलीस नेमके कोणासाठी काम करत आहेत. असा प्रश्‍न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
               कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शिवाजी दशरथ पवार यांना दि 12 रोजी मारहाण झाली. त्यांनी याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यास गेले  मात्र कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी फिर्यादिला गोड बोलून परत पाठवले व आरोपीविरुध्द गुन्हा दाखल होऊ नये याची पुरेपूर खास व्यवस्था केली. यानंतर फिर्यादी पवार हे गप्प बसले नाहीत त्यांनी पोलीस अधीक्षक व विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करत दाद मागितली. यावर वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना बोलावून घेत त्याचा जबाब नोंदवला व या प्रकरणात पवार यांची फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर दि 26 रोजी ही फिर्याद दाखल करण्यात आली. या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी यांनी आपण कोर्टाजवळ असताना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत बळजबरीने गाडीत बसवले व खंडाळा शिवारात नेऊन केबल, हायड्रोलिक पाईप, व लाथा बुक्क्यांने मारहाण केली व जबरदस्तीने चेकवर सह्या घेत खिशातील रोख 44 हजार रुपये रक्कम, सोनी कंपनीचा मोबाईल हँडसेट, काढून गाडीत बसवले व राशीन भिगवन टेंभुर्णी असे फिरवून राशीन येथे आणून सोडले. अशी फिर्याद शिवाजी दशरथ पवार रा. वडगाव तानपुरा यांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी अरुण पाटील, विकास यादव, सुरेश रामचंद्र जाधव हे सर्व रा.कोणावडे तां कडेगाव जी.सांगली यांचे सह रामहरी बिभीषण महारनवर,  किरण बिभीषण महारनवर, दोघे खंडाळा ता. कर्जत हनुमंत गणपत कवळे व सचिन हनुमंत कवळे रा. नागालवाडी ता. कर्जत व एक इतर व्यक्ती अशा आठ व्यक्तींंविरुध्द अनूसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहेत. सदरील फिर्याद दि 26 रोजी कर्जत पोलिस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget