Breaking News

सिंदखेडराजा येथे जिजाऊंचा सर्वात मोठा पुतळा उभारावा माजी मंत्री सुबोध सावजी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बुलडाणा,(प्रतिनिधी): राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थळ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा असल्याने त्यांच्या जन्मस्थळी महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारावा अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

   राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा या गावी लखुजी जाधव वडील व आई माणसा बाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी  12 जानेवारीला झाला. दरवर्षी  सिंदखेडराजा येथे 12 जानेवारीला जिजाऊ भक्त माँ जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनी येतात. जिजाऊ हया समाजशास्त्र, भौतिक व रसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र तसेच राजनीति शास्त्रच्या अभ्यासक होत्या.

 वकृत्व पेक्षा कर्तुत्वावर त्या विश्‍वास ठेवणार्‍या असल्याने त्यांनी सर्व नीतिशास्त्र बाल अवस्थेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवल्याने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. विद्यमान शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अरबी समुद्रात  उभारण्यास सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे छत्रपति शिवाजी महारांजचे मार्गदर्शक तथा गुरुस्थानी असलेल्या माँ जिजाऊ यांचा पुतळा महाराष्ट्रात सर्वात उंच त्यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे उभारण्यात यावा जेणेकरून सदर पुतळ्यापासून शिवप्रेमींना त्यांच्या कर्तुत्वाचे व स्वराज्याची प्रेरणा मिळून राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपति शिवाजी महाराज यांचे विचार आचारणात आणण्यास मदत होईल.तसे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविल्याचे सावजी यांनी सांगीतले.