Breaking News

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत तन्वीन तांबोळीला सुवर्णपदक


रहिमतपूर (प्रतिनिधी) : खेलो इंडिया युथ गेम अंतर्गत पुण्यात झालेल्या स्पर्धेमध्ये रहिमतपुरमधील तन्वीन तांबोळी हिने 21 वर्षाखालील व 70 किलो वजन गटामध्ये ज्युदो या खेळामध्ये अंतिम लढतीमध्ये राजस्थानच्या संजीव चौधरी हिला नमवत सुवर्णपदक पटकावले. या अगोदर तिने पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यातील खेळाडूंवरही मात केली.

येथील जेष्ठ सामजिक कार्यकर्ते अजमल आतार याची ती नात असून रोझरी शाळेमध्ये तिने प्राथमिक शिक्षण घेतले आहे. क्रीडाक्षेत्रात करिअर करण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून ती पुण्यात बालेवाडी क्रीडा प्रबोधनीत राहून ज्युदो या खेळासाठी प्रशिक्षण घेत आहे. या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाधक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, पोलिस पाटील दीपक नाईक, रहिमत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख आदींनी तिचे अभिनंदन केले.