Breaking News

भूजलाशी मैत्रीवर पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा; सहभागी होण्याचे जलतज्ञ मिलिंद बागल यांचे आवाहनकुळधरण/प्रतिनिधी
शाश्‍वत दुष्काळ निर्मूलन आणि पर्यावरण जलसमृद्ध गाव निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणारी भूजलाशी मैत्री या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा समग्र नदी परिवार ग्रुप पुणे व जलस्वराज्य फाउंडेशन, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील मनोहर मंगल कार्यालय येथे 10 व 11 जानेवारी रोजी होणार आहे. अशी माहिती जलस्वराज फाऊंडेशनचे अध्यक्ष जलतज्ञ मिलिंद बागल यांनी कर्जत येथे पत्रकाद्वारे दिली.


दुष्काळाची दाहकता वारंवारता पाहता प्रत्येक गावाला जलनियोजनाचे गांभीर्याने विचार करावा लागेल. गावागावात जलसंधारण विषय काम सुरू आहेत परंतु परिपूर्ण जल आराखडा तयार नाही. तांत्रिक मदत घेण्याबाबत लोकांमधील जलसाक्षरतेचा स्तर भयंकर अधोगतीला गेला आहे. हे चित्र बदलायचे हवे असेल तर महाराष्ट्रातील एकूण 44 हजार 185 सूक्ष्म पाणलोट स्तरावर किंवा प्रत्येक गाव स्तरावर ही व्यवस्था सरकारी पातळीवरूने व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. जलयुक्त शिवारसारख्या आदर्श योजनेचीही अशाच खड्डे-खोर तज्ञांमुळे वाट लागली, मात्र ज्या ठिकाणी तज्ञ अभ्यासक अधिकारी व गावकरी यांच्यात समन्वय राहिला तिथे हटकून यश दिसून येत आहे. याकरिता दुष्काळावर मात करण्यासाठी आणि प्रशासन ज्ञानी तज्ञ व जल अभ्यासकाशी जोडले जाणे यावर उपाय आहे. 


प्रशिक्षित अनुभवी जलतज्ञच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची जी वनवा आहे. उपाय म्हणून समग्र नदी परिवार व जलस्वराज फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये ही परिषद कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दुष्काळी संबंधी दिर्घकालीन उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासकीय धोरण व समाज प्रबोधन या दोन मुख्य घटकांचा प्रामुख्याने विचार करून भूपृष्ठ जलधोरण यावर जलसाक्षरतेचा भर देणार आहोत. समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी या चळवळीचे आपण शिलेदार बनावेत असे आवाहन जलतज्ञ मिलिंद बागल समग्र नदी परिवारचे सुनील जोशी व भूगर्भ तज्ञ उपेंद्र दादा धोंडे यांनी केले आहे.