Breaking News

वाहनांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


संगमनेर/प्रतिनिधी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या एजंटाने विक्रीसाठी आलेल्या दोन वाहनांची परस्पर विक्री करत अपहार केला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एजंट वैभव सुभाष  पांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी सखाराम काळे रा. सुकेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, काळे यांची पिकअप (एम. एच 17 ए.जी. 7523) योग्य दरात विकून देतो, ती  आमच्या दुकानावर लावा असे म्हणत पांडे याने पिकअप त्यांच्या घरून घेऊन गेला. चार दिवसांनी काळे हे पांडे यांच्या दुकानावर गेले असता त्यांना पिकअप दिसली नाही. 

याबाबत काळे यांनी विचारणा केली असता पिकअपची विक्री केली असून व्यवहार बाकी असल्याचे पांडे याने सांगितले. तेथे नंदू रोहिदास सातपुते रा.कनोली हे उपस्थित होते. आयटेन स्पोर्ट करची (एम.एच. 17 ए. झेड 3836) पांडे याने परस्पर विक्री केल्याचे सातपुते यांनी काळे यांना सांगितले. त्यानंतर दोघांनी पांडे यांकडे वाहनांबाबत    विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही वाहनांची परस्पर विक्री करून अपहार केल्याने काळे यांनी वैभव पांडे विरोधात दिलेल्या    फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.