Breaking News

गोदावरी कालव्यांच्या कामात लोकसहभागाबरोबरच शासनांने सहभाग द्यावा


कोपरगाव श./प्रतिनिधी  नाशिक, निफाड, कोपरगांव, राहाता, सिन्नर, श्रीरामपुर या सहा तालुक्यातील शेतकर्‍यांची जीवनदायीनी असलेल्या गोदावरी कालव्यांचे आर्युमान शंभर वर्षाच्यापुढे    झाल्यांने ते जीर्ण होवुन त्याची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यासाठी गोदावरी डावा आणि उजवा कालव्यांचे खोलीकरण रूंदीकरणांच्या कामात शेतकर्‍यांबरोबर साखर कारखाने, सहकारी सामाजिक संस्थांच्या पुढाकारातुन सहकार्य देण्यांचे ठरले असून लोकसहभागात शासनांने देखील जास्तीत जास्त आर्थिक सहभाग द्यावा. या मागणीचे निवेदन आ.स्नेहलता    कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी मुंबई येथे शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह दिले.


आ. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या निवेदनांत म्हटले आहे की, गोदावरी कालव्यांचे खोलीकरण रूंदीकरण लोकसहभागातुन करण्यांसाठी शेतकर्‍यांची बैठक नुकतीच क   ोल्हे कारखाना कार्यस्थळावर पार पडली. कारखान्यांच्यावतींने दोन बुलडोझर व एक पोकलॅन मशीन देण्यांचे बिपीनदादा कोल्हे यांनी मान्य केले. मात्र हे काम खुप मोठया प्रमाणांत असून त्यास आर्थिक पाठबळ लागणार आहे. कालवे नुतनीकरणांचे काम गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडुन अनेक वर्षापासून रखडलेले आहे.    लोकसहभाग कामांसाठी शासनांने आर्थिक पाठबळ दिल्यास अनेक वर्षापासुन रेंगाळलेले काम मार्गी लागेल व शेतकर्‍यांची परिस्थिती काही प्रमाणांत सुधारण्यांस मदत होईल.