Breaking News

पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये रेझिंग डे साजरा


पाथर्डी/प्रतिनिधी
पाथर्डी येथील पोलीस स्टेशनच्यावतीने रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनचा पदभार पत्रकार उमेश मोरगावकर, हरिहर गर्जे, अभिजित खंडागळे यांच्याकडे देण्यात आला होता. 

तसेच श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिशलाल गुगळे, प्रा.बथुवेल पगारे, योगेश घोडके आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पोलीस ठाणे अंमलदार कक्षात कशा पद्धतीने कामकाज चालते यांच्याबद्दल सखोल माहिती दिली. ठाणे अंमलदार म्हणून पत्रकार उमेश मोरगावकर, तर सीसीटीएनएस ऑपरेटर म्हणून पत्रकार हरिहर गर्जे व ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून पत्रकार अभिजित खंडागळे यांनी काम पाहिले.