बस-दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी


नांदुरा,(प्रतिनिधी): नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते जळगाव रस्त्यावर 1 जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

नांदुरा ते जळगाव हे रस्त्याचे काम सुरू आहे. मुरमाऐवजी रस्त्यात माती भरल्याने दिवसभर धूळ उडत असते. आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. 1 जानेवारी रोजी सकाळी 11.35 मिनिटांनी चक28 -त 8175 क्रमांकाची मोटारसायकल व कुर्हा ते खामगाव ही खामगाव आगाराची बस क्रमांक चक 12 उक 7124 मध्ये नवी येरळी जवळील सुपो जिनिंग समोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक शेख निहाल शेख इलियास (वय 25) हा गंभीर तर त्याचे वडील इलियास कुरेशी (वय 60) यांचा मृत्यू झाला. बसचे सुद्धा नुकसान झाले. झालेल्या अपघाताची माहिती व तक्रार देण्याकरता बसचालकाने नांदुरा पोलिस स्टेशन गाठले. जखमी मुलास नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने मुलास खामगाव येथून अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मुलगा व वडील दोन्ही मिळून छोटे मोठे व्यापार करत होेते. व्यापाराकरिता नांदुर्‍यावरुन आसलगाव येथे बाजाराकरिता ते दोघे जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget