Breaking News

मालगावमध्ये एकावर चाकूहल्ला


सातारा (प्रतिनिधी): किरकोळ कारणावरून मालगाव, ता. सातारा येथे एकावर चाकूहल्ला करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन औदुंबर कदम (रा. मालगाव) याच्यावर आज सकाळी साडेअकरा वाजता आत्त्याशी सारखा का भांडतोस? असा जाब विचारत चाकूने वार केले असून घरात असणार्‍या साहित्याची मोडतोड केली आहे. जखमी मोहन कदम याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.