Breaking News

म.रा.म.पत्रकार संघाचे वतिने मोफत रक्त तपासणी संपन्नमाजलगांव : प्रतिनिधी
गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचेवतिने विविध उपक्रम राबविण्यांत येतात.त्याचाच एक भाग म्हणुन दर्पण दिनानिमित्ताने आज दि.६ रविवार रोजी सकाळी ८ ते १० वा.पर्यंत पत्रकार, पेपर वितरक व पेपर वाटप करणार्या मुलांची व कुटुंबियांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे वतिने गेल्या चार वर्षापासून सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ व दर्पण दिना निम्मित विविध उपक्रमाने साजरा करण्यात येतो.त्याचाच एक भाग म्हणुन दि.६ रविवार रोजी येथील ग्रामिण रुग्णांलयात डॉ.गजानन रुद्रवार यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यांत आला.यात एकुण ८४ जणांच्या रक्ततपासणी होणार आहे. पत्रकार व त्यांचे कुटुंबियांनी सहभाग घेतला होता. तर या मोहिमेसाठी हिंद लॅब चे प्रमुख अमोल संभाजीराव बडे, लॅब टेक्निशियन सुशील वाघमारे, एल जी जाधव, कर्मचारी शंकर सोनवने, धनराज पानझडे, अलिफ शेख, यांनी हा उपक्रम यशस्वी राबवला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष उमेशकुमार जेथलिया, सचिव विजय मस्के, जिल्हा समन्वयक सुदर्शन स्वामी, तालुका उपाध्यक्ष भास्कर गिरी, किशन भदरगे, रविन्द्र राऊत, रविकांत उघडे, ज्योतीराम पांढरंपोटे व इतरांनी या करिता परिश्रम घेतले.
दुःखद घटनेमुळे आरोग्य शिबीर रद्द
येथील पत्रकार दिनकर शिंदे यांच्या वडिलांचे दुपारी १ च्या दरम्यान निधन झाल्यामुळे दु २ वाजता होणारे आरोग्य शिबीर रद्द करण्यात आले होते.
आज पुन्हा रक्त तपासणी
आज सकाळी १०.३० वा पासून पुन्हा रक्ततपासणी होणार असून तालुक्यातील पत्रकार व विक्रेते यांनि ग्रामीण रुग्णालयात याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.