Breaking News

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा - विद्यार्थी काँग्रेस


संगमनेर/प्रतिनिधी 
राज्यात खोटी आश्‍वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले. सरकारकडून शेतकरी , विद्यार्थी व युवक यांची फसवणूक सुरु आहे. अशातच अमरावती विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेले बेताल वक्तव्य निंदनीय असून याबाबत सर्वत्र टीका होत आहे. विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.


संगमनेर प्रांत कार्यालय येथे प्रांतधिकार्‍यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कि, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती विद्यापीठात संस्था चालकांशी संवाद साधतांना प्राचार्य संतोष ठाकरे यांनी अर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असतांनाही शिक्षण घेता येत नाही सरकार याबाबत त्यांना शिक्षणाची सोय करुन देईल का ? असा प्रश्‍न विचारला असता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी झेपत नसेल तर त्यांनी शिकू नये असे बेजबाबदार आणि बेताल उत्तर दिले. आज राज्यात सर्वत्र बिकट परिस्थिती असल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीचे कोणतेही भान न बाळगता बेताल वक्तव्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच याबाबत लवकरच कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी निखील पापडेजा, गौरव डोंगरे, विश्‍वास मिसााळ, शेखर सोसे, जिग्गेश मिलाणी, अभिनय रसाळ, सार्थक पवार, सदानंद गाडेकर, अनिकेत डांगे, शुभम सांगळे, ऋतीक सांगळे, किरण शिंदे, आकाश बनकर, अक्षय दिघे, सुरज शिंदे, निखील पवार, हैदरअली सय्यद आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.