Breaking News

विचारशून्यता ही देशाची मोठी समस्या : गडकरी


यवतमाळ : विचारशून्यता ही आपल्या देशातील मोठी समस्या असल्याचे वक्तव्य केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.वैशाली येडेंना संमेलनात बोलवण्याचा निर्णय चांगला आहे.आपला देश साहित्यिकांनी दिलेल्या विचारांवर उभा असल्याचेही ते म्हणाले.राजकारण्यांचे सर्व क्षेत्रात संबंध हवे मात्र त्यांचा हस्तक्षेप नको असल्याचे गडकरी म्हणाले.

ग्रंथ प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघता ग्रंथ प्रदर्शन एक दिवस वाढवण्यात आले आहे. इतिहासात पाहिल्यांदाच असा कालावधी वाढवण्यात आला आहे. यावेळी 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, स्वागताध्यक्ष मदन येरावार, उद्घाटिका वैशाली येडे, महामंडळच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, इंद्रजित ओरके, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्यासह इतर मान्यवर व्यसपीठावर उपस्थित आहेत. निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी हे संमेलन वादग्रस्त ठरले आहे. आज संमेलनाच्या तिसर्‍या दिवशी दोन्ही सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठराव वाचन आणि सदाशिवराव ठाकरे व सुभाष शर्मा यांचा सत्कार होईल. सायंकाळी 7 वाजता आकाशवाणी यवतमाळ प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात प्रमोद बावीस्कर, मंगला माळवे, जयंत शेटे, अतुल सारडे, शीतल देशमुख सहभागी होतील.