Breaking News

अ.भा.शाहीर परिषदेत रेखा महाजन यांचा सत्कार; कलावांतांच्या मानधानात वाढ करण्याचा ठराव संमंत


नाशिक/प्रतिनिधी : सिंगापूर येथे मिळालेल्या इंटरनॅशनल ग्लोबल बेस्ट सिटीझन पुरस्कार,व युनिव्हर्सल मल्टी टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद यासह शंभरहून अधिक पुरास्कार मिळाल्याबद्दल नाशिकच्या गायिका रेखा महाजन यांना अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या वतीने खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय शाहिर परिषदेची बैठक खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. 

या बैठकीत कलावंतांच्या मानधनात वाढ करावी या मागणीचा ठराव संमत करून, घरकुल योजना, कार्ड वाटप, इत्यादी विषयावर चर्चा झाली. या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी शाहीर परीषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विश्‍वास कांबळे, शाहीर बाळासाहेब भगत,नवनाथ गांगुर्डे महाराज, मेघराज बाफना, नृत्यगणा नंदा पुणेकर, करुणा टिळे सुप्रसिद्ध गायिका आणि निवेदिका रेखा महाजन चांदवड येथील सरपंच आदी मान्यवर आणि लोककलावंत मोठया संख्येने उपस्थित होते.