Breaking News

राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत तेजश्री कटरे हिची कामगिरीसातारा,(प्रतिनिधी) : सातारा जिल्हातील तेजश्री कटरे हिने सलग दोन वर्षे शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवुन इतिहास रचला आहे. गतवर्षी तेलगंणा येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सातारा येथील चॅम्पियन्स कराटे अ‍ॅकडमीची सुवर्ण कन्या तेजश्री कटरे हिला 14 वर्षाखालील मुली गटात सुवर्णपदक मिळवले आहे. तेजश्री ही इयत्ता चौथीमध्ये शिकत असल्यापासून कराटे क्लासला येते.

 तिचे वडील दत्तात्रय कटरे मजूरी करतात व आई शेतीकाम करते. तेजश्रीला 5 बहीणी असून ती सर्वात मोठी आहे. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही तिच्या वडिलांनी तिच्या हट्टासाठी तिला कराटे क्लास लावला. तिचे प्राथमिक कराटे प्रशिक्षण कोडोली येथील साई सम्राट हॅालमध्ये झाले. तिथे प्राथमिक प्रशिक्षण पुर्ण करून आता चॅम्पियन कराटे अकॅडमी, शाहपूरी येथे गुरुजी सिहान संतोष मोहीते यांच्या मार्गदर्शक खाली दररोज 5 तास ट्रेनिग करते तिची जिद्द आणि महत्वकांशा त्याचबरोबर प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट आणि गुुरु संतोष मोहीते यांचा आर्शीवाद आणि बहुमूल्य मार्गदर्शन या सर्वांचा संगम म्हणजे तेजश्री कटरेचे सुवर्ण यश. ज्या वयात मुली लंगडी, भांडीकुंडी खेळताना त्या वयात तेजश्रीने कराटे ड्रेस आणि ग्लोज घालून कराटेचे सामने खेळण्यास सुरुवात केली. ती चॅम्पियन कराटे अ‍ॅकडमी येथे सिहान मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4 वर्ष प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत तिने 25 सुवर्ण, 14 रोप्य , 11 कास्य मिळविलेे आहेत.