वाई शहरात पत्रकार दिन उत्साहातमेणवली, (प्रतिनिधी) : पत्रकार हा समाजाचा आरसा व निरीक्षक असून स्वतः अडचणीचा सामना करून प्रसंगी धोका पत्करून सर्वसामान्यांच्या अडचणी मांडण्याचे व सोडवण्याचे खरे काम पत्रकार निस्वार्थीपणे करतो जनतेचा व प्रशासनाचा दुवा असणार्‍या पत्रकारांच्या निर्भिड लेखनीमुळे अनेक क्षेत्रातील मूलभूत प्रश्‍नांना वाचा खर्‍या अर्थाने फोडली जावून तळागाळातील जनतेला न्याय मिळत असल्याचे मत राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशचे मुख्य संघटक राजेंद्र लवंगारे यांनी व्यक्त केली. पत्रकार दिनानिमित्त वाईच्या शासकीय विश्रामगृहात राज्य पत्रकार परिषद संलग्न वाई पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश संघटक प्रकाशआप्पा येवले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुलुंगे, रामराव पिसाळ, प्रियाताई पोळ, पूजा लोळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे अमर बनसोडे, संकल्प करियर अकॅडमी संस्थापक प्रा. भाऊसाहेब सपकाळ, रामदास कांबळे, अ‍ॅड. जगदीश पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती  दरम्यान, वाईच्या शासकीय विश्रामगृहावर जेष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष दौलतराव पिसाळ, उपाध्यक्ष अनिल काटे, विनोद पोळ, सचिव संजीव वरे, कार्याध्यक्ष तानाजी कचरे, राजगुरू कोचळे, अभिनव पवार, बापूसाहेब वाघ, समीर मेंगळे, विशाल रोडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मधुकर साबळे, सुनील फणसे, दिलीप यादव, संतोष पोळ, विजय सावंत प्रकाश जाधव, योगेश माळवे, दीपक भडंगे, विलास डांगे, नीलेश डांगे, सूरज सोनवणे, दिलीप चव्हाण, गरीश गाढवे व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget