Breaking News

उक्कलगाव येथील देवस्थानचा वाद चिघळणार; हरिहर केशव गोविंद देवस्थान ट्रस्टचा विश्‍वस्त मंडळ वाद


पुढील सुनावणी 28 जानेवारीला
श्रीरामपूर/प्रतिनिधी
श्रीरामपुर परिसरामधील उक्कलगाव येथील हरिहर केशव गोविंद देवस्थानचा ट्रस्ट वाद हा लांबण्याच्या मार्गावर आल्यामुळे न मिटतात हा वाद चिघळण्याचे दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

येथील ट्रस्टी विश्‍वस्त असलेले यांनी ठरविले तर हा ट्रस्टचा वाद गावातल्या गावात मिटणे शक्य आहे. तसे न होता हा वाद न्याय प्रविष्ठच राहिलेला वाद येथे मिटून जाऊ शकतो. पण अशा मनस्थितीतच कोणी नेत्याकडून या संबधीतच दुजोरा मिळेला नाही. हरिहर केशव गोविंद देवस्थानचा वाद हा धर्मादाय आयुक्तलयाच्या कोर्टात वाद सुरु आहे. गेल्या दोन वर्षापासुन देवस्थानातचा वाद हा न्याय कक्षेत असल्यामुळे कोर्टा पायर्‍या झिजविण्याची वेळ आता आलेली आहे. नवीन सत्तांतर झाल्यापासुन युवा तरुणाकडे सत्ता आल्याने देवस्थानचाच कारभार हाती घेतला होता. त्यावर पाहिल्याच बैठकीत हा ट्रस्टीचा वाद चिघळला होता. अनेकांचे हावेदावे समोर आले होते. पंरतु देवस्थानचा वाद हा मुळ राजकारणावरच अवलंबुन राहिलेला आहे. 
हिशोबापासुन सुरु झालेला वाद नवीन विश्‍वस्त नेमविण्यापर्यंत आलेला आहे. हा मिटण्याच्या मार्गावर दिसत नाही. दि 5 जानेवारी 2019 धर्मादाय आयुक्तलाय कोर्टाने संबधितच हरकतीदार गैरहजर राहिल्याने 28 जानेवारी सुनावणी होणार आहे. उक्कलगाव येथील ग्रामसभा सुरु असतांना अचानक ग्रामविकास अधिकारी यांनी देवस्थान बाबतीच पत्र ही दाखल होते. त्यावरच हरकती नोंदणी दाखल करा. तर ग्रामसभा आटोपती घेत तातडीने वेगवेगळया नगर येथील धर्मादाय आयुक्तलयात कोर्टात हरकती दाखल नोदंविल्या होत्या. त्यानंतर त्यांना ही पुढील सुनावणी मिळाली होती. सबंधितच हरकतीदार वेळेत हजर नसल्यामुळे 28 जानेवारी ही मेहरबान कोर्टाने दिलेली आहे. मागील काही वर्षापासुन सुरु असलेला वाद हा गावाच्या हितानुसार नसुन हा तर देवस्थानचा तोटांचा आहे. तर लवकराच वाद मिटावा अशी हरिहर भक्ताची धारणा आहे. जर न्याय प्रविष्ठ वाद मिटला तर अनेक देवस्थानचे कामे मार्गी लागले जातील. पण आता ही स्थिती नसुन उपलब्ध झालेले हे चार गटाने एकत्र येऊन वाद गावातल्या गावात मिटावा. अशाप्रकारे त्यातीलच ’ काही ’ नेत्याच्या बोलण्यावरुन समजते. देवस्थान वादपुढे आल्यामुळे खंडोबा मंदिर, मंगल कार्यालय, आणि इतर अनेक विषय तिढा सुटल्याला वेळ लागणार नाही. गावामधील नेत्याने एकत्र बसुन तिढा कायमचा सोडवा. जर हा वाद मिटला तर देवस्थानचा नुकसान ही होणार नाही. सगळयांनी हे ध्यानात घ्यावे. निव्वळ राजकारण न करता गावा हितानुसार निर्णय घ्यावा. 

श्री हरिहर केशव गोविंद देवस्थान नोंदणी क्र.314 नवीन प्रस्तावित सुधारित योजनेच्या मसुद्यातील विश्‍वस्त मंडळ हे फक्त मराठा समाजाचेच दर्शविलेले आहे. या विश्‍वस्त मंडळावर हरकत घेत गिरीष मोरे यांनी नवीन सुधारीत प्रस्तावित विश्‍वस्त मंडळ निवड प्रक्रिया ग्रामसभेतुन सुचविलेल्या इच्छूक उमेदवारांतून ग्रामपंचायत सदस्यांच्या मान्यतेने सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नवीन प्रस्तावित योजनेकरिता सादर करण्यात यावे अशी मागणी केली.
-गिरीष मोरे