Breaking News

प्राजक्ता घोगरेची इस्रो सहलीसाठी निवड अभिमानास्पद - पवार


जामखेड ता./प्रतिनिधी
केरळमधील भारतीय अवकाश संशोधन संस्था आय. एस. आर. ओ. येथे अभ्यास दौर्‍यासाठी कु.प्राजक्ता हनुमंत घोगरे हिची निवड झाल्याबद्दल धोंडपारगाव ग्रामस्थांच्यावतीने तिचे अभिष्टचिंतन तथा नागरी सत्काराचे आयोजन जामखेडचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की प्राजक्ताने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अतिशय कमी वयात मिळवलेले दैदिप्यमान यश हे अनेकांना नक्कीच प्रेरक ठरेल. प्राजक्ता ही उत्तम कबड्डीपटू असून गतवर्षी ’चला खेळूया ’ या क्रीडाप्रकारात तिचा मुलींच्या कुस्ती स्पर्धेत 32 किलो वजनी गटांत तालुक्यात द्वितीय क्रमांक आला होता. तिला हार्मोनिअम वादनाची देखील आवड असून राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील यशाबद्दल तिचा नुकताच जामखेड येथे गौरव झाला. ती सध्या धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे इ.5 वीत शिक्षण घेत असून तिने आतापर्यंत विविध विषयांवर कवितांचीदेखील निर्मिती केली आहे. माझी अविस्मरणीय इस्रो सहल या विषयावर पुस्तक लिहीण्याचा मनोदय व्यक्त करणे हे तिच्यातील सुप्त लेखिका असण्याचे लक्षण आहे. असे पवार साहेब म्हणाले. तिच्या या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे, कांतीलाल ढवळे व केंद्रप्रमुख सुनिल बुद्धीवंत यांनी तिचे अभिनंदन केले. डॉ.पांडुरंग अर्जुन नेटके एम.व्ही.एस.सी.) यांनी ऑस्ट्रेलियाहून कौतुक करून तिच्या गौरवार्थ नेटके परिवारामार्फत स्मृतीचिन्ह दिले तर तिला पुढील शिक्षणासाठी एच. यु. गुगळे पतसंस्था जामखेड, प्रसिद्ध लेखिका डॉ.लता पाडेकर, श्रीराम सह.साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर निंबाळकर, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याचे सरचिटणीस निळकंठ घायतडक, गोकुळ ढवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांनी बक्षीसरूपात मोठी मदत केली. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी मार्केट जामखेडचे संचालक तथा जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच सुखदेव शिंदे , रामचंद्र शिंदे, पेमराज शिंदे, नामदेव खलसे, पोपट ढवळे, गणेश नेटके, हनुमंत शिंदे, राजेंद्र शिंदे, पै.दत्ता शिंदे, वैभव कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक दत्तवाडी शाळेचे उपाध्यापक संभाजी सरोदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी मानले.