Breaking News

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण आज सायंकाळी रंगणार दीपोत्सव सोहळा


राष्ट्रमाता जिजाऊंच्या साठी इमेज परिणाम

 सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण होत आली असून, 32 कक्षांच्या बैठका झाल्या आहेत. जिजाऊभक्तांच्या उपस्थितीत शुक्रवारी 11 जानेवारीच्या सायंकाळी दीपोत्सव सोहळा पार पडणार आहे.

 जिजाऊ भक्तांची गैरसोय होऊ नये,म्हणून वाहनतळ, दुकाने, हॉटेल, रंगरंगोटी , प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. तर दररोज सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे मराठा सेवा संघाचे वतीने दरवर्षी 12 जानेवारी रोजी जागतिक स्तरावरुन जिजाऊ जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे केले जाते. या सोहळयामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील तसेच परदेशातूनही जिजाऊ भक्त सहभागी होतात. या वर्षी 12 जानेवारी रोजी 421 व्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा सेवा संघाच्या 32 कक्षाच्या अनेका बैठका झाल्या असून, या सोहळयासाठी येणार्‍या जिजाऊ भक्तांसाठी आयोजन समितीतर्फे निवास व्यवस्था महिला पुरुष, वाहन तळ, व चारशेच्यांवर पुस्तकांचे स्टॉल व शंभर खाद्य पदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

11 जानेवारी रोजी सांयकाळी सहा वाजता 421 मशालींसह संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांनी मशाल यात्रेचे राजवाडा ते जिजाऊ सृष्टी व रात्री साडेसहाच्या दरम्यान संत तुकाराम संगीत नाटय जिजाऊ सृष्टी येथे सादर होणार आहे. 12 जानेवारी रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळयाची सुरुवात जन्मस्थळ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाडयावर महापूजनाने होणार आहे. सकाळी 7 वाजता वारकरी दिंडी, 9 वाजता जिजाऊसृष्टीवर ध्वजारोहण, 10 ते 1.30 पर्यंत सकाळचे सत्र व शिवधर्मपीठावरील मुख्य कार्यक्रमाची सुरूवात दुपारी 2 वाजता होणार आहे. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजेभोसले, छत्रपती बाबाजी राजेभोसले, शिवश्री जन्मेजय राजेभोसले, डॉ. अमोल कोल्हे व लेंफटनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना मराठा सेवा संघाचा मराठा विश्‍वभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.