Breaking News

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी


पंचकुला: पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगसह चौघांना दोषी ठरवले आहे. 16 वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली होती. 17 जानेवारीला रहीमसह चौघांना शिक्षा सुनावली जाणार आहे. 


छत्रपती हा डेर्‍यात होणार्‍या अवैध घटनांशी संबंधित वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत होता. 2002 मध्ये त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रामचंद्रच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती. तसेच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 2007मध्ये सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हत्येचा कट रचल्याचा आरोप राम रहीमवर ठेवण्यात आला होता. या हत्येच्या खटल्याची सुनावणी आज झाली. या सुनावणीसाठी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने राम रहीमसह कृष्ण लाल, कुलदीप आणि निर्मल सिंग यांना दोषी ठरवले. 17 जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल.