Breaking News

तुळजाभवनीच्या चरणांना प्रथम महिलेकडून स्पर्श



तुळजापूर/ प्रतिनिधीः
परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन एका महिलेने देवीचे चरणस्पर्श करून पूजा केली. राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणार्‍या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नसे; मात्र तुळजापूर शहरातीलच काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे.
मंजुषा मगर असे या महिलेचे नाव असून, त्यांनी देवीच्या गर्भगृहात जाऊन देवीची पूजा केली. अनेक वर्षांची परंपरा त्यामुळे मोडीत निघाली. त्यांच्यासोबत अन्य काही पाळीकर पुजारी महिलाही होत्या. आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखीत अनुमती नव्हती. या संदर्भात काही महिला जिल्हाधिकार्‍यांना जाऊन भेटल्या. मंदिर संस्थांच्या कुठल्या रेकॉर्ड किंवा नियमात हे आहे का, याची विचारणा केली. त्यासंदर्भात नियम नाहीत हे लक्षात आल्यानंतर काल रात्री या महिला मंदिराच्या गर्भगृहात घुसल्या आणि देवीचा चरणस्पर्श केला.