Breaking News

सोनाअलॉईज कंपनीच्या कामगारांचे प्रश्‍न सोडवू : ना. रामराजे


लोणंद (प्रतिनिधी) : सोना अलॉईज कंपनीमधील कामगारांनी अन्य कोणाच्याही भूलथापाना बळी पडू नये. कंपनीसंबंधी असलेले सगळे निर्णय आपण कामगारांच्या बाजूनेच व्हावेत, विशेष लक्ष घालून सामोपचाराने हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे. येथील एमआयडीसीमधील स्टील उत्पादन करणार्‍या सोना अलॉईज प्रा. लि. या कंपनीतील कामगारांच्या प्रश्‍नाबाबत आणि त्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ना. रामराजे यांनी वरील मत मांडले. 

ते म्हणाले की, कंपनीच्या व्यवस्थापनाकडे गेल्या वर्षभरापासून सोना अलॉईज एम्प्लॉईज युनियनने पगारवाढ, ओव्हर टाईम कामाचा पगार, मेडिक्लेम इन्शुरन्स व अन्य मागण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच कंपनी व्यवस्थापणाने वेळोवेळी लेखी व तोंडी आश्‍वासने देऊनही युनियनच्या मागण्या मान्य न केल्याने सोना अलॉईज एम्प्लॉईज युनियनने कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाच्या धोरणाविरोधात गेल्या 15 दिवसांपासून काम बंद आंदोलन शांततेत व सनदशीरमार्गाने सुरू केले आहे. गुरुवारी या आंदोलन ठिकाणी मा रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन कामगारांशी चर्चा करुन आपण कायदेशीर मार्गाने कायदा हातात न घेता काम करू तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी कंपनीच्या मालकाशी बोलून प्रयत्न करणारकंपनीसंबंधी असलेले तुमचे सगळे निर्णय आपण तुमच्या बाजूने कसे होतील ह्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले.