Breaking News

विज्युक्टा संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभामेहकर,(प्रतिनिधी):  माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. पानझाडे यांचे सोबत नूतन  विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा शिक्षणाधिकारी कार्यालयात  पार पडली.  सभेला काळुसे उपशिक्षणाधिकारी तथा वेतन पथक अधीक्षक प्रामुख्याने उपस्थित  होते. या सभेमध्ये प्रश्‍नांवर विचार विनीमय सकारात्मक निर्णय घेण्यात  आले. त्यामध्ये 23 ऑक्टोबर 2017 चा वरिष्ठ व निवड श्रेणीचा शासन निर्णय  कनिष्ठ महाविद्यालयासाठी लागू नाही.

त्यामुळे शासन निर्णया नुसार  कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे  प्रस्ताव ना मंजूर केल्या जाणार नाहीत. 1 नोव्हेंबर 2005 अगोदर नियुक्त  शिक्षकांचे जीपीएफ खाते उघडण्याबाबत औरंगाबाद वेतन पथक कार्यालयाच्या  पत्राची शहानिशा केल्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल. डीसीपीसी  हिशोबाचे काम सुरु असून त्याला गतिमान करण्या करता लवकरच प्रत्येक  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला आर 3 फॉर्म भरण्या करता एक्सेल शीट  ऑनलाइन दिल्या जाईल. जीपीएफ हिशेब पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील  एका कनिष्ठ महाविद्यालयाला नोडल नियुक्त करून त्या कॉलेज मध्ये जीपीएफ  हिशोबा करता जीपीएफ रजिस्टर उपलब्ध केल्या जाईल. संबंधित तालुक्यातील  विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशेबा  करता तालुक्यातील नोडल कॉलेज मध्ये जाऊन 10 जानेवारी 2019 पर्यंत हिशेब  पूर्ण करावा लागेल. 2018 2019 च्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता  येत्या 7 तारखे पर्यंत बुलडाणा येथे वाटप कँप लावून एकाच दिवशी वितरीत  करण्यात येतील. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे 2013-14 पर्यंतची  कोणतीही प्रकरणे बाकी नसल्याची शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. सहविचार  सभे मध्ये जिल्हा अध्यक्ष प्रा. शिवराम बावस्कर, जिल्हा सचिव प्रा. किशोर  काकडे, सदस्य प्रा. संजय किणगे, प्रा. रवींद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष  प्रा. गणेश भरगडे, प्रा. गजानन गाडेकर, संघटन सचिव प्रा. शिवाजीराव काळे,  प्रा. संजय भाकडे, सहसचिव प्रा.जी आर तायडे, प्रा. रवींद्र खरात, प्रा.  देवकर, प्रा. इरफान प्रसिद्धी प्रमुख प्रा.. गणेश शिंदे, प्रा.  विश्‍वासराव लोहार, प्रा. ईलाही बक्ष, प्रा.. रवींद्र धन्नावत, नवनियुक्त  सदस्य प्रा. शुक्ला, कार्याध्यक्ष प्रा. रहेमान, मोताळा तालुकाध्यक्ष  प्रा. नंदकुमार वानखडे, सचिव प्रा.समीउल्ला, डी. एस. राठोड, प्रा.  किंबहुने, प्रा.पुनिया, प्रा.अंभोरे, प्रा. सवडतकर, प्रा. गजानन राठोड  यांच्यासह पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.