Breaking News

महिलांनी आरोग्य दृष्ट्या सक्षम व्हावे- गडाख; नेवासे येथे सर्वरोग निदान शिबीर


नेवासे फाटा/प्रतिनिधी
आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरामध्ये सुमारे दीडशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. घरप्रपंच सांभाळत आजची महिला ही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जाण्याची वेळ महिलांवर येत असल्याने आपल्या आरोग्याची काळजी घेत महिलांनी आरोग्य दृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन सुनिता गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासे येथे स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे उदघाटन सुनिता गडाख यांच्या हस्ते बुधवारी दि.16 रोजी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. समर्पण फाउंडेशन व लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबीर कार्यक्रमाच्या डॉ.विद्या शिर्के ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. ऋषिकेश पंडित, स्नेहलता शिंदे, महंमदभाई शेख, नगरसेविका फिरोजबी पठाण, डॉ.नरेंद्र पंडित, डॉ.भाऊसाहेब घुले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी प्रास्ताविक केले.लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे लक्ष्मण नाबदे यांनी स्वागत केले.

यावेळी बोलतांना सुनिता गडाख पुढे म्हणाल्या की, आपले घर सांभाळून महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे महिलांचे चाळीस टक्के आरोग्य असुरक्षितच असते . ती जर आरोग्याच्या दृष्टीने सक्षम झाली, तर ती समोर येणारी विविध आव्हानाला सामोरे जाऊ शकते. महिलांनी आहार व आरोग्यकडे जास्त लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावा व खर्‍या अर्थाने सक्षम बनण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी बोलताना केले.
यावेळी डॉ.ऋषिकेश पंडित यांनी लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियाबद्दल माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी डॉ. विद्या शिर्के, डॉ.अशोक शिंदे, समर्पण फाउंडेशनचे प्रवक्ते पत्रकार सुधीर चव्हाण, प्रा. देविदास साळुंके यांनी आपल्या भाषणाद्वारे मारुतराव घुले पतसंस्थेच्या व नंदकुमार पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून शिबिराला शुभेच्छा दिल्या. नितीन ढवळे यांनी सूत्रसंचालन केले तर जयदीप जामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक लक्ष्मण जगताप, फारूक आतार, जितेंद्र कुर्‍हे, नगरसेविका अंबिका ईरले, सतीश पिंपळे, गोरक्षनाथ काकडे, मार्केट कमिटीचे माजी सहसचिव बाळासाहेब पारखे, विकास शेंडे, रामभाऊ केंदळे, संजय घुले, किशोर सोनवणे, पतसंस्थेचे व्यवस्थापक अंकुश धनक, जालिंधर गवळी व आदी उपस्थित होते. यावेळी मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिरामध्ये सुमारे दीडशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.