Breaking News

बेस्ट पाठोपाठ ‘मोनो रेल’ कर्मचार्‍यांचा संपाचा इशारामुंबई : बेस्ट पाठोपाठ मोनो रेलच्या कर्मचार्‍यांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोनो रेलची सेवाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. संपावर गेला, तर शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा एमएमआरडीने कर्मचार्‍यांना दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोनो रेलचे 198 कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. अनुभव नसलेल्या शिकाऊ मुलांकडून मोनो रेल चालवून घेतली जात आहे. आम्हाला दिलेली आश्‍वासने पूर्ण झाली नसल्याची माहिती मोनो रेलच्या एका कर्मचार्‍याने दिली आहे. शिकाऊ मुलांकडे मोनो रेल चालवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्रही नसून हा एक प्रकारे प्रवाशांचे प्राण धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. मागच्या महिन्यापासून एमएमआरडीने मोनो रेलचे संचालन स्वत:च्या हातात घेतले. त्याआधी स्कॉमी ही मलेशियन कंपनी मोनो रेल चालवत होती.