Breaking News

अखेर वादग्रस्त तलाठ्याच्या बदलीचे आदेश; ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील गोळेगाव, नागलवाडी, सेवानगर, शेकटेखुर्द येथील तलाठी सातत्याने शेतकर्‍यांची अडवणूक करीत असल्याने त्यांच्या बदलीसाठी संतप्त ग्रामस्थांनी गोळेगाव तलाठी कार्यालयासमोर सोमवारी उपोषण केले होते. या दरम्यान तहसिलदार विजय भांबरे यांनी तातडीने संबधित तलाठ्याचे तातडीने बदलीचे लेखी आदेश दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. 

पूर्व भागातील गोळेगाव, नागलवाडी, सेवानगर, शेकटेखुर्द येथे नियुक्त महिला तलाठी कार्यालयात वेळेत येत नाहीत कधी आल्या तर अडवणूक करून श्रावणबाळ, संजय गांधी निराधार आदी योजना व शेतकर्‍यांचे बोंड आळीचे अनुदान शेतकर्‍यांचे संयुक्त खातेवरील अनुदान पत्रांशिवाय लाभार्थी शेतकर्‍यांना पेमेंट देवू नये. असे लेखी पत्र बँकेला दिल्याने शेतकर्‍यांना मंजूर अनुदान वेळेत मिळत नाही तसेच विविध महसूल दाखल्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम केले जात नाही. अशी तक्रार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करील अशी धमकी देवून माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा असे सांगून अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याचा मोठा मनस्ताप शेतकर्‍यांना सोसावा लागत होता. या तक्रारीमुळे ग्रामस्थ मेटाकुटीस आले होते. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी महसूल प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याने ग्रामस्थात मोठा असंतोष निर्माण झाला होता ग्रामस्थांनी दोन महिन्यांपूर्वी बदलीची मागणी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली, परंतु महसूल प्रशासनाने बदली करण्यात टाळाटाळ केल्याने ग्रामस्थात मोठा असंतोष निर्माण झाला तलाठ्याची तातडीने बदली करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गोळेगाव तलाठी कार्यालयासमोर सरपंच विजय साळवे, संजय आंधळे, बाळासाहेब फुंदे, नागलवाडीचे सरपंच गोरख खेडकर, बाळासाहेब ढाकणे, रामदास आंधळे, जगन्नाथ मारकंडे, प्रकाश मारकंडे, वसंत बर्डे, भुजंग फुंदे, पोपट आंधळे, गोविंद बर्डे, साहेबराव आंधळे व महिलासह शेकडो ग्रामस्थांनी दि. 7 रोजी उपोषण पुकारण्यात आले. यावेळी तहसिलदार विजय भांबरे यांनी तातडीने संबधित तलाठ्याचे तातडीने बदलीसह नव्याने तात्पुरता लेखी आदेश बोधेगावचे मंडलाधिकारी बडे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर पुकारलेले उपोषण मागे घेण्यात आले. वादग्रस्त तलाठ्याची बदली झाल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे. 


 विरोधी पक्षनेत्यांनी घेतली दखल

उपोषणकर्त्यांनी थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे कैफियत मांडली. मुंडे यांनी त्वरीत जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क केल्यानंतर उपविभागीय अधिकारी व तहसिलदार भांबरे यांनी चर्चा करून तातडीने तलाठीचे बदलीचे आदेश काढण्यात आले. त्याची लेखी प्रत दिल्यानंतर उशिराने उपोषण मागे घेण्यात आले.