Breaking News

डंपरच्या धडकेत बालक गंभीर जखमी


पाटण,  (प्रतिनिधी) : भरधाव निघालेल्या डंपरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कदमवाडी नजीक शाळकरी विद्यार्थ्याला जोराची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
येथील मल्हारपेठ, ता. पाटण येथिल कदमवाडी नजीक 31 डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास चिपळूण वरून कासेगावकडे निघालेला वाळूने भरलेला डंपर (एमएच 12 एचडी 1715) हा भरधाव वेगाने जात असताना कदमवाडी नजीक उताराला डंपर चालक रमजान ईस्माईल बुरान (वय 45, रा. पाटण) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने डाव्या बाजूकडून शाळेतील तासासाठी निघालेल्या राज सचिन पानस्कर (वय 10) या मुलाला जोराची धडक बसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला.
अचानक घडलेल्या अपघातामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्या मुलाला तिथून उचलून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्याचबरोबर चिपळूणवरून कासेगावकडे येत असताना चालक रमजान ईस्माईल बुराण (वय 45) राहणार पाटण ह्याने धडक दिली. तो आडुळ नवारस्ता व मल्हारपेठ हरणेश्‍वर पूल या ठिकाणी अनेक वाहनांना धडक देऊन तो पुढे निघून आला. त्याच वेळेला त्याचा ताबा सुटून कदमवाडी नजीक या मुलांना धडक दिल्याने ग्रामस्थांनी डंपर थांबवून त्याला बेदम चोप दिला. चालकावर मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.