Breaking News

राजकारण, स्वार्थ हा विरोधकांचा अजेंडा : कर्‍हाडकर


पांचगणी (प्रतिनिधी) : फक्त राजकारण आणि आर्थिक स्वार्थ हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा असून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणीचे मोठे झालेलं नाव धुळीस मिळवण्याचे काम विरोधकांनी हाती घेतले आहे .शहराच्या विकास आणि स्वच्छतेचे त्यांना काहीही देणं घेणे नाही, असा घंणाघाती आरोप नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. पांचगणी पालिकेच्या आरोग्य सभापतींनीच काल दुर्घधीयुक्त कचरा नेणारे दोन ट्रक पकडून पोलीस ठाण्यात हजर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा कर्‍हाडकर यांनी पत्रकार परिषदेत आज त्यांची भूमिका मांडली. सौं कर्‍हाडकर पुढे म्हणाल्या, पाचगणीत गोळा होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. परंतु थर्माकोल, प्लास्टिक, काच, मेटल, सेनेटरी पॅड, नॅपकिन या कचर्‍यावर प्रोसेसिंग होत नाही आणि पांचगणी हे एको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यास पर्यावरण कमिटीची बंधने आहेत. त्यामुळे या नॉन प्रोसेसिंग कचर्‍यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पूर्णपणे ठेकेदारांची असून त्याच्या विल्हेवाटीसाठी लागणारे पालिकेचे सर्व लेखी आदेश ठेकेदाराला आहेत. 


शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही म्हणणार्‍या आरोग्य सभापतींनी स्वच्छतेत देशात पुढे असणार्‍या पांचगणी शहराच्या आगामी सेवन स्टार रेटिंग, ओ डी एफ प्लस प्लस, स्वच्छता अभियानात भाग घेण्याच्या ठरावाला विरोध का केला ? विकासाच देणं घेणं नसणार्‍या आरोग्य सभापतींनी स्वच्छतेबाबत कमिटीच्या किती मिटिंग घेतल्या ? स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहाराचा बद्दलत असणारा चेहरामोहरा विरोधकांच्या डोळ्यात खूपत असल्याचा आरोपही यावेळी केला.

सत्तेतील नगरसेवक विरोधात गेले नसून अशाच विरोधी कारवायांमुळे मी त्यांना सत्तेतून हद्दपार करीत हाकलले आहे, ते स्वत:हून गेले नसल्याचा पुनरुच्चारही सौ. कर्‍हाडकर यांनी यावेळी केला.