Breaking News

कडवे-केळेवाडी रस्त्याच्या कामास वेग


शेंद्रे (प्रतिनीधी) : पाटण तालुक्यातील कडवे खुर्द ते केळेवाडी वरची येथील रस्त्याच्या कामास जोमाने सुरवात झाली आहे. स्थानिक रहिवाश्यांच्या दळणवळणाच्या समस्या, पावसाळ्यात होणारे हाल व अन्य अनेक अडचणींचा गांभीर्याने विचार करून आमदार शंभूराज देसाई यांच्या अथक प्रयत्नांतून या रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील वाहनधारक व नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

या कामासाठी आ. देसाई यांनी पाच कोटी 14 लाख 34 हजार रूपये मंजूर करुन दिले असून कामास प्रत्यक्षात जोमाने सुरवात झाली आहे.