Breaking News

ज्वेलर्सचे दुकान फोडून दीड लाखांपर्यंत मुद्देमाल चोरीला


पाथर्डी (प्रतिनिधी)
अभिजीत खंडागळे

तालुक्यातील खरवंडी कासार येथील राष्ट्रीय महामार्गच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भर बाजारपेठेतील दत्तात्रय धारकर यांच्या सोन्याच्या दुकानाचे शेटर अज्ञात ५ चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने उचकटून चोरी केल्याची घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.यामध्ये अंदाजे दीड लाखांपर्यंत मुद्देमाल चोरीला गेला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी भेट दिली.चोरीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार आहे.

.....याबाबत विश्ववसनीय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,खरवंडी कासार येथील रहिवासी दत्तात्रय धारकर यांचे भर बाजारपेठेत दुकान असून नेहमीप्रमाणे बुधवारी आपले दुकान बंद करून घरी गेले.पहाटे स्थानिक नागरिकानी त्यांना तुमचे दुकांनाचे शेटर उचकटले असल्याचे कळवले.त्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात येऊन पाहिले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर पाथर्डी पोलिसांनी याबाबत त्यांनी माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,पोलीस हवालदार रांजणे,पोलीस शिपाई भगवान सानप, अमोल कर्डीले आदी धाव घेतली.

....तेथील सि.सी.टीव्ही.फुटेज च्या कॅमेऱ्यात ५ अज्ञात इसम कैद झाले आहेत.तर या चोरीमध्ये दुकानातील ग्राहकाने दुरुस्ती करण्यासाठी टाकलेले सोने,इतर सोने चांदी असा एकूण अंदाजे दीड लाखापर्यंत म
मुद्देमाल चोरीला गेला आहे.

....घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे काही पुरवा मिळतो याचा शोध घेत आहेत तसेच घटनास्थळी सराफ संघटनेचे बाळासाहेब जिरेसाळ,जिल्हा संघटनेचे राजू शेठ शेवाळे,सुनील शेट भांगे व खरवंडी कासार सोनार उपस्थित आहेत.