Breaking News

राज्य पेन्शनर्स असोसिएशनवर तरडगावचे डॉ. पोरे


तरडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन संघटनेच्या संचालकपदी तरडगाव (ता. फलटण) येथील सदाशिव परशराम पोरे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते डॉ. पोरे यांचा नुकताच फलटणमध्ये सत्कार करण्यात आला.पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोशिएसन संघटनेच्या निवडणुकीत सदाशिव पोरे यांना लक्षणीय मताधिक्य मिळाले. 

असोसिएशनवर विजयी झाल्याने त्यांची राज्य संघटनेच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल फलटण येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते डॉ. पोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेजसिंह खानविलकर, आनंदराव शिंदे, रामचंद्र शेडगे, विठ्ठलराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सदाशिव पोरे हे गेली दहा वर्षे तालुका व जिल्हा पातळीवर या संघटनेमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, जिल्हा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या निवडीबद्दल डॉ. पोरे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.