देऊळगाव राजा शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा करा शिवसंग्रामचा न.प.ला हांडे बजाव आंदोलनाचा इशारादेऊळगांव राजा(प्रतिनिधी): नगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे सध्या देऊळगांव राजा शहराला 20 ते 22 दिवसाआड अनियमित नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.त्यामुळे नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत असल्याने नगर पालिकेने तात्काळ उपाय योजना करून शहराला कमीतकमी 8 दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी आज शिवसंग्राम संघटनेच्या वतीने नगर पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

मागणी मान्य न झाल्यास नगर पालिकेच्या विरोधात हांडे बजाव आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. देऊळगांव राजा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई सुरू असून याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.देऊळगांव राजा तालुक्यात संतचोखा सागर खडकपूर्णा धरण आहे.या धरणातून शहराला पाणी पुरवठा केल्या जात आहे.या व्यतिरिक्त शिराळा व सावखेड भोई येथून देखील शहराला पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे.मात्र नगर पालिकेच्या नियोजन शून्य कार्यप्रणालीमुळे शहराला 20 ते 22 दिवसाने पाणी पुरवठा केल्या जात आहे.विशेष म्हणजे खडकपूर्णा प्रकल्पावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असतांना देखील शहराला 20 ते 22 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.नळाद्वारे नियमित व सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिक विशेष करून महिला त्रस्त झाल्या आहेत.शहरात काही भागातील महिला पारिसरातून डोक्यावर हांड्याने पाणी आनतांनी दिसत आहे.तर काही भागातील विहिरींचा अनेक वर्षांपासून उपसा नसल्याने महिला त्या विहिरीवरुन पाणी देखील अनु शकत नाही.तसेच यावर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहे.आशा भीषण परिस्थितीतून देऊळगांव राजा शहर वाशीयांचे जीवन जगने सुरू आहे.मात्र नगर पालिका पाण्या सारख्या महत्वाच्या प्रश्‍नावर गंभीर दिसत नाही.यामुळे यावर्षी हिवाळ्यातच शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लक्षात घेता शहराला कमीतकमी दर आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा,त्यासाठी नगर पालिका प्रशासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात.तसेच पुढील दुष्काळाच्या दाहकतेवर खबरदारी म्हणून शहरातील विहिरीचा उपसा आणि स्वच्छ करून त्यांना अधिग्रहण करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने नगर पालिका मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मागणी मान्य न झाल्यास 8 जानेवारी 2019 रोजी नगर पालिका प्रशासनाचा निषेध म्हणून हांडे बजावआंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.सदर निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका संघटक जहीर खान,शंकर शिंदे,संतोष हिवाळे,विनोद खार्डे,अजमत पठाण,आयाज पठाण,अनिस खान,मदन डुरे,तौसिफ पठाण यांच्या स्वाक्षर्‍या आहे. नगर पालिका कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असतांनी देखील पाण्या सारख्या गंभीर समस्याबाबदचे निवेदन आंदोलनादरम्यान देण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget